राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांची पत्नी क्रांती रेडकर या मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान समीर वानखेडे महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिकांनी सांगितले. यावर क्रांती रेडकर यांनी दुपारच्या जेवणाचे फोटो ट्विट करत मलिकांना उत्तर दिले आहे.
क्रांती रेडकर यांनी दुपारच्या जेवणाचे फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की, आम्ची दुपारच्या जेवणात दाल मखनी आणि जीरा राईस खाल्ला आहे. जीरा राईस घरी बनवला होता तर दाल मखनी बाहेरून मागवले होते. या दाल मखनीची किंमत १९० रुपये आहो. मी पुराव्यासह ही माहिती माध्यमांना देत आहे, जेणेकरून उद्या कोणी म्हणेल की आम्ही असे जेवण जेवतो जे सरकारी अधिकाऱ्याचे कुटुंब खाऊ शकत नाही.
We had dal makhni and jeera rice for lunch,jeera rice was home made , daal makhni was ordered from out, priced at 190rs.Informing the media with proofs, just in case someone puts allegations tomorrow morning that we ate some food that a government official’s family must not have. pic.twitter.com/hKpAQmwleY — KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) November 2, 2021
वानखेडे कुटुंब महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिक म्हणाले. समीर वानखेडे सत्तर हजाराचे शर्ट वापरतात तर दोन लाख रुपयांचे बुट वापरतात. तसेच एक लाख रुपयांची पॅंट वानखेडे वापरतात. आणि वानखेडेंच्या मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ असते. त्यामुळे वानखेडे इतक्या महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.