भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; युद्धासारख्या परिस्थितीत कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

सोशल मीडियाच्या या युगात तणावपूर्ण परिस्थिती सुरू असताना कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात आणि कोणत्या गोष्टींची माहिती देण्यास टाळावे.

भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; युद्धासारख्या परिस्थितीत कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमध्ये मिसाईल आणि ड्रोनने हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली असून, यादरम्यान सरकारने अशा सर्व राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही कुठे ब्लॅकआउट केले जात आहे याची माहिती काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहेत. अशा प्रकारची माहिती लोक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या शहरासोबतच सुरक्षा तयारीसाठी देखील गंभीर धोका निर्माण करू शकते.

चला तर जाणून घेऊया सोशल मीडियाच्या या युगात तणावपूर्ण परिस्थिती सुरू असताना कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात आणि कोणत्या गोष्टींची माहिती देण्यास टाळावे.

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा

अशा परिस्थितीत काय करू नये:

1 – सर्वप्रथम, तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणाचा ब्लॅकआउट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे टाळा.

2 – जर तुमच्या शहराच्या परिसरातून सेनेचे किंवा कोणतेही वाहन येताना दिसले तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका.

3 – सोशल मीडियावर युद्धाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही फोटो आणि व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.

4 – अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्यतो घरातच राहा.

5 – चुकीच्या माहितीवर प्रतिक्रिया देऊ नका, घाबरू नका किंवा कोणतेही बेकायदेशीर पाऊल उचलू नका.

6 – सुरक्षा दलांच्या कामात अडथळा निर्माण करू नका, त्यांनी दिलेल्या सूचनांचा आदर करा.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

अशा परिस्थितीत काय करावे?

1 – सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. शक्यतो सरकार, सैनिक किंवा स्थानिक प्रशासन यासारख्या प्रमाणित स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितींवरच अवलंबून रहा.

2 – शांतता राखा, अफवा टाळा आणि सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करा.

3 – युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहा.

4 – वृद्ध, मुले आणि अपंगांना प्रथम प्राधान्य द्या आणि गरज पडल्यास मदत करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number