‘चंद्रकांत पाटलांनी मला खिशात ठेवले तर…’; मलिकांचे आव्हान

  क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरूच ठेवले आहेत. मलिकांनी भाजपवरही अनेक आरोप केले आहेत. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे लोक मी खिशात ठेवतो. यावर आता नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा मोठा आहे. त्यामुळे […]

‘चंद्रकांत पाटलांनी मला खिशात ठेवले तर…’; मलिकांचे आव्हान

  क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरूच ठेवले आहेत. मलिकांनी भाजपवरही अनेक आरोप केले आहेत. याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असे लोक मी खिशात ठेवतो. यावर आता नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खिसा मोठा आहे. त्यामुळे आता मी वाट बघतोय ते कधी मला त्यांच्या खिशात टाकत आहेत,’ असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नवाब मलिकांनी हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी मला त्यांच्या खिशात ठेवले तर मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे खिशात टाकण्याचे आव्हान नवाब मलिकांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number