आरोग्य विभागाच्या गट ‘क’च्या पेपरफुटी प्रकरणी पुण्याच्या सायबर विभागाने बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी बीडमधील शिक्षक उद्धव नागरगोजे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून पुणे पोलीस पथक बीडमध्ये शिक्षक उद्धव नागरगोजे यांचा शोध घेत होते. आणि अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे याला अटक करण्यात आली आहे. तसेच उद्धव नागरगोजे आणि काल अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी उद्धव नागरगोजे, प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप जोगदंड, नामदेव करांडे, शाम मस्के या आरोपींना अटक करण्यात आली आहे.