गंगा एक्सप्रेस – वेवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं; पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायूदल सज्ज

भारताच्या गंगा एक्स्प्रेसवेवर प्रथमच लढाऊ विमाने उतरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसवेवर रात्रीच्या वेळेसही लँडिंग होऊ शकते.

गंगा एक्सप्रेस – वेवर लढाऊ विमानांची प्रात्यक्षिकं; पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायूदल सज्ज

भारताच्या गंगा एक्स्प्रेसवेवर प्रथमच लढाऊ विमाने उतरवण्यात येणार आहेत. जलालाबादजवळील या विशेषतः तयार केलेल्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या राफेल, मिराज आणि जग्वार विमानं आपले अद्वितीय कौशल्य दाखवत प्रात्यक्षिकं सादर होणार आहेत. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसवेवर रात्रीच्या वेळेसही लँडिंग होऊ शकते, आणि रात्रीच्या वेळी लँडिंग करण्याची क्षमता असलेली भारतातील पहिली एक्सप्रेसवे एअरस्ट्रिप आहे. 

हवाई दलाच्या या मिशनमुळे भारताने आपली युद्धसज्जता आणि आपत्ती व्यवस्थापनातील तयारी दाखवून दिली आहे. युद्धजन्य स्थिती, नैसर्गिक आपत्ती किंवा तत्काळ तैनातीसाठी या प्रकारची धावपट्टी अत्यंत महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणारअसून, यावेळी एअर शोचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. 

या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर 2 आणि 3 मे रोजी कटरा-जलालाबाद मार्ग बंद ठेवण्यात यवनार आहेत.  सकाळी 9:45 ते 10:30 दरम्यान भारतीय हवाई दल विविध लढाऊ विमानांचे सराव आणि लँडिंगचे प्रात्यक्षिक दाखवतील.बुधवारी डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह आणि एसपी राजेश द्विवेदी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. भटक्या गुरांचे व्यवस्थापन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शालेय मुलांसाठी बसण्याची व्यवस्था सुधारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडण्यासह इतर व्यवस्था वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number