‘फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरु’ – नवाब मलिक

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.   नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. […]

‘फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरु’ – नवाब मलिक

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.

  नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणाशी काय संबंध? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. तसेच फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.

  देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणे गायले होते. हे गाणे म्हणजे नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनलेले होते. हे गाणे सोनु निगम आणि अमृता फडणीस यांनी गायले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या गाण्यात अभिनय केला  होता. अमृता फडणवीस यांच्या गाणाल्या जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवले होते. जयदीप राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. तसेच राणा आणि फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राणा आणि फडणवीस यांचे गणपती विसर्जनाचे सोबत फोटो देखील आहेत. त्यामुळे हे प्रकरण राज्यातील ड्रग्ज व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिकांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number