डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते लोकशाही म्हणजे काय; जाणून घ्या बाबासाहेबांचे लोकशाहीबाबतचे 10 विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे. बाबासाहेब हे गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समतेच्या त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते लोकशाही म्हणजे काय; जाणून घ्या बाबासाहेबांचे लोकशाहीबाबतचे 10 विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे. बाबासाहेब हे गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समतेच्या तत्वांनी प्रेरित होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढा दिला.जाणून घ्या बाबासाहेबांचे लोकशाहीबाबतचे 10 विचार  

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ मतदानाचा हक्क नाही, तर आर्थिक, सामाजिक क्रांती घडवण्याचे साधन आहे.

2. 'लोकशाही म्हणजे रक्तपाताशिवाय क्रांती.' – बाबासाहेबांची ही व्याख्या आजही मार्गदर्शक ठरते. त्यांचे लोकशाहीविषयक विचार केवळ राजकीय नव्हते, तर सामाजिक बदल घडवण्यासाठी होते. त्यांनी जुलूम, जातीयता आणि गुलामगिरी नष्ट करण्यासाठी लोकशाहीची गरज अधोरेखित केली.

3. 'लोकशाही म्हणजे सहजीवन' – त्यांच्या मते लोकशाहीची मुळे सामाजिक संबंधांमध्ये असतात. समाजात जेव्हा भिन्न गटांमध्ये सांस्कृतिक मतभेद, सहजीवनाची भावना नसेल, तेव्हा खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही.

4. दारिद्र्य, जातीयता आणि निरक्षरता – लोकशाहीतील अडथळे बाबासाहेबांच्या मतानुसार, जोपर्यंत ही त्रिसूत्रे संपत नाहीत, तोपर्यंत लोकशाही खरी अर्थाने अस्तित्वात येणार नाही.

5. मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक – त्यांच्या मताने राजकीय लोकशाही ही चार आधारस्तंभांवर उभी असते:
(१) व्यक्ती हेच एकमेव साध्य,
(२) व्यक्तीला अदेय हक्क असावेत,
(३) हक्कांच्या बदल्यात व्यक्तीने विशेषाधिकार गमावू नयेत,
(४) शासनाची सत्ता खासगी व्यक्तींना न देता जनतेतून यावी.
त्यामुळे त्यांनी सर्व सत्तावादांचा विरोध केला – मग तो फासिस्टवाद असो की अराजकवाद.

6. संसदीय पद्धतीची मुळे आत्मनिर्भरतेत – बाबासाहेब संसदीय लोकशाहीवर भर देतात. त्यांना विश्वास होता की ही पद्धत सहकार्य, शिस्त, जबाबदारी, आणि अहिंसक बदलासाठी योग्य आहे. खुल्या चर्चेने निर्णय घेणे ही संसदीय पद्धतीची शक्ती आहे.

7. 'आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण!' – अमर्याद स्वातंत्र्य हे गरीबांच्या हक्कांवर गदा आणू शकते. बाबासाहेबांनी युरोपातील देशांचे उदाहरण देत सांगितले की, आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष झाल्यास, लोकशाहीही केवळ नावापुरती राहते.

8. सदसद्विवेकबुद्धी – लोकशाहीचा खरा कणा – ‘अन्याय घडो कोठेही, चरफडून उठू आम्ही’, ही भावना बाबासाहेबांना आवश्यक वाटत होती. समाज जर शोषणाबद्दल अनभिज्ञ किंवा उदासीन राहिला, तर लोकशाही अस्तित्व टिकवू शकत नाही.

9. संघटित राजकीय पक्षांची आवश्यकता – बाबासाहेब म्हणतात की, टीका करण्याचा हक्क आणि एक विरोधी पक्ष असणे हे संसदीय लोकशाहीसाठी अनिवार्य आहे. ‘एकट्या पक्षाने सत्ता चालवणे म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल’ – त्यामुळे त्यांनी द्विपक्षीय पद्धतीचा आग्रह धरला.

10. विरोधकांनी जबाबदारीने वागावे – बाबासाहेबांच्या मते, केवळ विरोधासाठी विरोध करणे, आक्रस्ताळेपणा, सभात्याग, विध्वंसक राजकारण हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी परस्पर सन्मान, संवाद आणि सहकार्य या तत्त्वांवर चालावे – हाच खरा लोकशाहीचा गाभा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number