Delhi Airport Incident: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI Airport) प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टर्मिनल १ परिसरात एका प्रवाशावर कथितरित्या पायलटने मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संबंधित पायलटवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुरक्षा तपासणीदरम्यान घडली. पीडित प्रवाशाचा आरोप आहे की, ड्युटीवर नसलेल्या एका पायलटने त्याच्याशी गैरवर्तन करत शाब्दिक वादानंतर थेट मारहाण केली. प्रवासी आपल्या कुटुंबासह विमानतळावर उपस्थित होता. सुरक्षा तपासणीसाठी विशेष तपासणी मार्गाचा वापर करण्यास सांगितल्यानंतर रांगेतून पुढे येण्यावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
Here is a short video of Capt. Virender Sejwal looking at me lying on the floor, covered in blood, and probably realising the gravity of the situation for the first time. And a few more things that I did not mention in my earlier post:
? My wife kept requesting for first aid.… https://t.co/CXlrqchhxC pic.twitter.com/x49XtWvfpE — Ankit Dewan (@ankitdewan) December 20, 2025
पीडित प्रवाशाने सोशल मीडियावर आपली आपबीती मांडत सांगितले की, वाद वाढल्यानंतर पायलटने अपमानास्पद भाषा वापरली आणि अचानक हल्ला केला. या मारहाणीत आपल्याला दुखापत झाली असून रक्तस्रावही झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसमोर घडली, ज्यामुळे ती मानसिक धक्क्यात असल्याचेही प्रवाशाने म्हटले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रवाशांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः विमानतळासारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारची हिंसक घटना घडणे अत्यंत गंभीर बाब आहे.
दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसने या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करत घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, संबंधित पायलटला तात्काळ कामावरून निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच, कायदा अंमलबजावणी यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे.
सध्या या घटनेचा तपास सुरू असून, व्हायरल व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षा, कर्मचारी वर्तन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.