क्रुझवरील आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितले की, समीर दाऊद वानखेडे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मीच केली होती. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिकांवर टोला लगावला आहे.
प्रविण दरेकर म्हणाले, ‘समीर वानखेडेंच्या बदलीचा निर्णय ही एनसीबीची अंतर्गत बाब आहे. समीर वानखेडे यांच्याकडून एखाद्या प्रकरणाचा तपास काढून घ्यायचा किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार एनसीबीचा आहे. असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले. केवळ नवाब मलिक यांनी आरोप केले म्हणून समीर वानखेडे यांच्याकडचा तपास काढून घेतला असे मानण्याचे काहीही कारण नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
क्रुझवरील आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणाची तपासणी मुंबई विभाग एनसीबीचे संचालक समीर वानखेडे करत होते. मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह हे आर्यन खानची चौकशी करणार आहेत.