‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’ – अमृता फडणवीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. तसेच जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणाशी काय संबंध? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत […]

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’ – अमृता फडणवीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. तसेच जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणाशी काय संबंध? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मलिकांना उत्तर दिले आहे.

  मलिकांनी केलेल्या आरोपांवर अमृता फडणवीसांनी ट्विट केले की, ‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !’ असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा – ‘फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरु’ – नवाब मलिक

  देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात त्याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ गाणे गायले होते. या गाण्यात सोनु निगम आणि अमृता फडणवीस यांचे स्वर होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या गाण्यात अभिनय केला होता. अमृता फडणवीस यांच्या गाणाल्या जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवले होते. जयदीप राणा हे ड्रग्ज पेडलर आहेत. तसेच राणा आणि फडणवीस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राणा आणि फडणवीस यांचे गणपती विसर्जनाच्या वेळीचे सोबत फोटो देखील आहेत. त्यामुळे हे प्रकरण राज्यातील ड्रग्ज व्यवसायासंबंधित असल्याचा गौप्यस्फोट नवाब मलिकांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number