राज्यात अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागत आहे. मात्र अशातच नोव्हेंबरच्या सुरुवातीला परतीच्या पावसाची शक्यता दर्शवली जात आहे. राज्यात पुन्हा पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
येत्या १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस तसेच राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच सोलापुरमध्ये ३ नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना अर्लट राहण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आले आहे.