‘क्या हुआ तेरा वादा…जयंतराव जी!’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दारुबंदी उठविल्यानंतर आता अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांकडून राज्य सरकारवर टीका होत […]

‘क्या हुआ तेरा वादा…जयंतराव जी!’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दारुबंदी उठविल्यानंतर आता अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांकडून राज्य सरकारवर टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत याबाबत जाब विचारला आहे.
 
‘क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी, सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार, इस आश्वासन का… यवतमाळ राहिलं दूर पण चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने, महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल’, असं ट्विट चित्र वाघ यांनी केलं आहे.
 
यवतमाळमध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन देतानाचा जयंत पाटील यांचा व्हिडिओ चित्र वाघ यांनी ट्विट केला आहे. ‘आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहीलं काम आम्ही करू, चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये को होत नाही’, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.
 
 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number