पद्मविभूषण, इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी झाला. बाबासाहेब पुरंदरे उर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे असे त्यांचे पूर्ण नाव. ‘जाणता राजा’ या नाटकामुळे बाबासाहेब पुरंदरे जनतेच्या घराघरात पोहचले. तसेच समुह नाटकाचे कर्तेधर्ते म्हणून त्यांची समाजात ओळख निर्माण झाली. ‘वन्ही तो चेतवावा। चेतविता चेततो।‘ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत त्यांनी मराठी मनाची मरगळ दूर केली.
बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, ‘जर १२५ वर्षांचे आयुष्य मिळाले असते तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल’ असे ते म्हणाले होते. बाबासाहेबांनी रक्ताचे पाणी करून मुंबईत १९७४साली शिवसृष्टी उभारली होती. तसेच बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचे एक अतूट नाते आहे. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी बाबासाहेबांना लक्षावधी मैलांचा प्रवास करावा लागला. समाजात बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर म्हणून ओळखत असे.
२०१२साली बाबासाहेब पुरंदरे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. तर २०१३ डी.लिट. पुरस्कार बाबासाहेबांना प्रदान करण्यात आला. २०१५मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले तर २०१६मध्ये त्यांना गार्डियन-गिरीप्रेमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नौबत, प्रतापगड अशी बाबासाहेब पुरंदरे यांची अनके पुस्तके प्रसिद्ध आहेत.