कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप

कोल्हापूर पोटनिवडणूकीमुळे राजकीय वातावरत तापले असून पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मविआवर टीका सतत टीका करत आहे. ‘राष्ट्रवादी सरकार चालवत असून काँग्रेस आणि सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरू असल्याची’, टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर […]

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप

कोल्हापूर पोटनिवडणूकीमुळे राजकीय वातावरत तापले असून पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मविआवर टीका सतत टीका करत आहे. ‘राष्ट्रवादी सरकार चालवत असून काँग्रेस आणि सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरू असल्याची’, टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्ही एकसंघ आहेत. या निवडणुकीत भाजपला स्थानिक कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने ४० नेते आणि तीन लाख नागरिक प्राचाराला आणायची भाषा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील रंकाळा तलाव परिसरात चाय पे चर्चामध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number