‘वर्गणीच्या पैशातून मलिकांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा’ – अतुल भातखळकर

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर अनेक आरोप केले आहेत. तर त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप मलिकांनी केले आहेत. त्यामुळे संतप्त भाजप नेत्यांनी मलिकांवर टीका केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मलिकांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.   अतुल भातखळकर […]

‘वर्गणीच्या पैशातून मलिकांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा’ – अतुल भातखळकर

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर अनेक आरोप केले आहेत. तर त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप मलिकांनी केले आहेत. त्यामुळे संतप्त भाजप नेत्यांनी मलिकांवर टीका केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मलिकांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

  अतुल भातखळकर यांनी ट्विट करत लिहिले की, ‘नवाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखे बरळत आहेत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की? नाही तर वर्गणी काढून यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा’, असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी बोचऱ्या शब्दात मलिकांवर टीका केली आहे.

  भाजपचे आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर टीका केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, असे म्हणत श्वेता महाले यांनी मलिकांवर टीका केली आहे. तसेच त्यांनी ट्विट केले की, ‘नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करत आहोत एवढे भान ठेवावे… आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, ‘कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात’, असे ट्विट श्वेता महाले यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number