‘मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय’

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताचा दिग्ग्ज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बृजभूषण सिंह प्रकरणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. त्याला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्याआधी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी २१ डिसेंबर रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. महिला कुस्तीपटू साक्षी मलिक नंतर आता बजरंग पूनियाने भारतीय कुस्ती महासंघाच्या […]

‘मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय’

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताचा दिग्ग्ज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बृजभूषण सिंह प्रकरणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. त्याला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्याआधी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी २१ डिसेंबर रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

महिला कुस्तीपटू साक्षी मलिक नंतर आता बजरंग पूनियाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षाची घोषणा झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. बजरंगने त्याला मिळालेलं पद्म पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बजरंगने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
तसेच बजरंगने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. “मी पद्म पुरस्कार पंतप्रधान यांना परत करत आहे. माझ्याकडे बोलण्याबाबत फक्त पत्रच आहे”, असं बजरंगने म्हटंलय. तसेच बजरंगच्या या भूमिकेवरुन क्रीडा मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number