भारतीय रिले टीम पदकापासून वंचित

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजर खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर. भारतीय खेळाडूंनी हिट २ मध्ये आशियाई विक्रमासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण पदक शर्यतीत अमेरिकन, जर्मन, फ्रेंच आणि जैमैकन खेळाडूंसमोर भारतीय खेळाडू थोडे कमी पडले. त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे […]

भारतीय रिले टीम पदकापासून वंचित

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजर खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर. भारतीय खेळाडूंनी हिट २ मध्ये आशियाई विक्रमासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण पदक शर्यतीत अमेरिकन, जर्मन, फ्रेंच आणि जैमैकन खेळाडूंसमोर भारतीय खेळाडू थोडे कमी पडले. त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हिट २ मध्ये भारतीय संघाने आशियाई विक्रमाची नोंद करत अंतिम फेरीत धडक दिली होती. मुहम्मद अनास, मुहम्मद अजमल, राजेश रमेश आणि अमोज जेकब या चौघांनी २ मिनिटे ५९.०५ मिनिटे सेकंदाची वेळ नोंदवून नवा आशियाई आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला. यापूर्वीच राष्ट्रीय विक्रम हा ३:००.२५ सेकंद इतका होता, तर आशियाई विक्रम २ मिनिटे ५९.५१ सेकंद हा होता. अंतिम फेरीमध्ये त्यांनी २ मिनिटे ५९.९२ सेकंदाची वेळ नोंदवली. हिट २ पेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतला. अमेरिकेने २ मिनिटे ५७.३१ सेकंदांसह सुवर्ण, फ्रान्सने २ मिनिटे ५८.४५ सेकंदांसह रौप्य, तर जर्मनीने २ मिनिटे ५८.७१ सेकंदासह कांस्य पदक जिंकले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number