नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा दिलेला नाही. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर मागील दोन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. मात्र अखेर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला […]

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा दिलेला नाही. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर मागील दोन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. मात्र अखेर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करणार आहेत.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणाणी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.

कुठे आहेत नितेश राणे?

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. दरम्यान मागील तीन दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात असून पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे.

नारायण राणेंना पोलिसांची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यासाठी नारायण राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र नारायण राणे चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट नारायण राणे यांच्या घरावर नोटीस चिटकवली. नोटीस चिकटवताना खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून व्हिडीओग्राफी करण्यात आली असून याचा पंचनामा करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number