या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर त्यांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटफेर झाले आहेत. अमेरिकेतील मंद चलनवाढीच्या आकडेवारीमुळे शुक्रवारी, 19 डिसेंबर, रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोने-चांदीचे दर खाली आले. नाताळपुर्वी सोने-चांदीच्या दरात झालेली किंचित घट ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद आणु शकते.
हेही वाचा- BMC Election 2026: मुंबईत पवारांची ठाकरे बंधूंना साथ? राज-उद्धवकडे किती जागांची मागणी?
दरम्यान आता देशांतर्गत सराफा बाजारातील आज सोने आणि चांदीचे ताजे दर काय आहेत पाहूया. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,34,850 रुपये झाला असून 22 कॅरेट सोन्याचा दर 12,360, प्रति 10 ग्रॅम 1,23,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,01,140 रुपये झाला आहे. तसेच चांदीची किंमत 2,11,110 रुपये असून चांदी 224 प्रति ग्रॅम 224,000 प्रति किलोग्रॅम आहे.
हेही वाचा- Rupee Vs Dollar: रुपयाचा कमबॅक! डॉलरच्या तुलनेत रूपया 89 च्या पातळीवर पोहोचला
दरम्यान गुंतवणुकदारांसाठी बाजार उघडताच एमसीएक्सवर चांदीचा मार्च वायदा किंमत 0.26% कमी होऊन प्रति किलो 2,03,034 रुपयांवर घसरले आहेत. तसेच सोन्याचे फेब्रुवारी फ्युचर्स 0.56% घसरून प्रति 10 ग्रॅम 1,33,772 रुपयांवर कमी झाले. अमेरिकेतील कमी महागाई आकडेवारीच्या पार्श्वभूमिवर आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. डॉलर निर्देशांक 0.10% वाढून एका आठवड्याच्या उच्चांकाजवळ व्यवहार करत होता, ज्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी झाले. दरम्यान ख्रिसमसपूर्वी सोने 1.36 लाख रुपयांचा टप्पा ओलांडते का? यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.