‘४८ तासात संबंधित ट्विट मागे घ्या, अन्यथा…’ – अमृता फडणवीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जप्रकरणाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच वाद रंगले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे ड्रग्जप्रकरणात सापडले असल्याचे विधान केल्यामुळे समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी […]

‘४८ तासात संबंधित ट्विट मागे घ्या, अन्यथा…’ – अमृता फडणवीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जप्रकरणाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यात चांगलेच वाद रंगले आहेत. दरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे ड्रग्जप्रकरणात सापडले असल्याचे विधान केल्यामुळे समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील नवाब मलिकांना नोटीस बजावली आहे.

  ‘४८ तासांमध्ये संबंधित ट्विट मागे घ्या, आणि माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा’, असा इशारा अमृता फडणवीस यांनी नोटीसमधून दिला आहे. तसेच भांदविच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत कारवाईचा इशाराही अमृता फडणवीस यांनी दिला आहे. अमृता फडणवीस यांनी मलिकांना नोटीस पाठवून नवाब मलिकांची नेमकी संपत्ती आहे तरी किती? असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी फौजदारी कारवाईचा इशाराही मलिकांना दिला आहे.

नवाब मलिकांचे जावई समीर खान यांची फडणवीसांना नोटीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे ड्रग्जसोबत सापडले असल्याचे विधान केल्यामुळे समीर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली. देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबावर खोटे आरोप केले असल्याचे समीर खान यांनी सांगितले. तसेच त्यांना झालेल्या त्रासामुळे ४ कोटी रुपये नुकसान भरपाई आणि बिनशर्त माफी मागावी असे नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे.

  समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून माफीची मागणी केली आहे. त्यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा समीर खान यांनी दिला आहे. तसेच नोटीसमध्ये समीर यांनी अब्रनुकसानीचा दावा केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number