राज ठाकरेंच्या सभेचं काय होणार?

१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेची सभा पार पडणार आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप पोलिसांची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी अद्याप मौन बाळगलं आहे. मनसेच्या सभेसाठी अर्ज करून […]

राज ठाकरेंच्या सभेचं काय होणार?

१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसेची सभा पार पडणार आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप पोलिसांची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचं काय होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेबाबत पोलिसांनी अद्याप मौन बाळगलं आहे. मनसेच्या सभेसाठी अर्ज करून सहा दिवस झाले मात्र, अजूनही सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठ उभारण्याची तयारी केली आहे. मात्र, अद्याप राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलिसांची परवानगी मिळालेली नाही.

राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा, त्यानंतर ठाण्यातील मनसेची उत्तर सभा चांगलीच चर्चेची ठरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असून अनके आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकित भाजपने बहिष्कार टाकला तर राज ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या जागी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिनिधित्व केले. राज्य सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री १० ते सकाळी ६ याच वेळात वापरण्यावर बंदी आहे,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची सभा पाडणार आहे. मनसेच्या या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number