Gautami Patil : "जे बिग बॉसच्या घरात जातात त्यांच…" लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

बिग बॉस मराठी सिझन सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा कानावर पडल्या याबद्दल अनेक चर्चा देखील होत असल्याची माहिती समोर आली.

Gautami Patil : &quotजे बिग बॉसच्या घरात जातात त्यांच…&quot लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोबद्दल गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

सध्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये एकच चर्चेचा विषय घोळतोय तो म्हणजे बिग बॉस मराठी सिझन 6 कधी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अशातच बिग बॉस मराठी सिझन 6 च्या नव्या प्रोमोतील रितेश देशमुखचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. यासर्वांमध्ये आणखी एका गोष्टीची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे ती म्हणजे यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक पाहायला मिळणार. याचपार्श्वभूमिवर सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा कानावर पडल्या याबद्दल अनेक चर्चा देखील होत असल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा- Nidhi Agarwal Viral Video: साऊथच्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सचा संताप

बिग बॉस मराठी शोच्या 6 व्यापर्वाची घोषणा झाल्यावर गौतमीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील एक लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी आणि महाराष्ट्राला वेड लावणारी लावणी कलाकार आहे. नुकतीच ती अभिजीत सावंतसोबत 'रुपेरी वाळू' या म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे. दरम्यान आता ती बिग बॉस सिझन 6 मध्ये दिसणार का? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत तिला ‘बिग बॉस मराठी 6’ या सीझनमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारताच तिने त्यावर सरळ शब्दात उत्तर दिलं तसेच तिनी यावेळी बिग बॉस शोची स्तुती केली. 

हेही वाचा- Bigg Boss Marathi : 'स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…', रितेश भाऊ घेऊन येत आहे महाराष्ट्राचं तुफान!

यावेळी तिने मुलाखत देताना म्हटलं की, "मला बिग बॉसतर्फे बिग बॉसच्या 6 व्या पर्वात बोलवण्यात आलं होत. अभिजीत दादा ज्यावेळेस बिग बॉसमध्ये होता त्यावेळेस मला शोमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आलं होत. जे कोणी बिग बॉसमध्ये जातात त्याचं करिअर होतंच, बिग बॉस खरंच खूप छान शो आहे. पण मी बिग बॉसच्या घरात जाऊ शकणार नाही. यामागचं माझं कारणही वेगळ आहे. मी माझ्या आईला सोडून कुठेही जास्त दिवस राहू शकत नाही. तिला मी सोडू शकत नाही. आत्तापर्यंत मी कधीच माझ्या आईला सोडून 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त दिवस कुठेही बाहेर राहिले नाही. या कारणामुळे मी बिग बॉसच्या घरात जाणं टाळते." असं म्हणत गौतमी पाटीलने बिग बॉसच्या घरात न जाण्यामागचं कारण स्पष्ट केलं. 

हेही वाचा- Akshaye Khanna on Dhurandhar : सगळा भारत अक्षय खन्नाच्या प्रेमात पण त्याचं काहीतरी वेगळंच, म्हणाला, 'फरक पडत नाही…'

दरम्यान बिग बॉस सिझन 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यंदाच्या सीजनमध्ये कोणत्या सेलिब्रिटीला घरात प्रवेश मिळणार, कोणाच्या नशिबाची किल्ली फिरणार आणि कोण बाहेरचा रस्ता धरायला लागणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. एकूणच, बिग बॉस मराठी सीजन 6 च्या आगमनाची चाहूल लागताच मनोरंजनप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा बहुप्रतिक्षित सीजन लवकरच कलर्स मराठीवर पाहायला मिळणार असून, आता प्रेक्षकांनी हा शो पाहण्यासाठी काउंटडाऊन सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number