अरे, मी नाना पाटेकर आहे..; दिग्दर्शकाने नानांना तब्बल 20 वर्षे काम न देण्याचं सांगितलं कारण, म्हणाले, ‘ते मला कुठेही गाठून…’

सध्या 'ओ रोमियो' (O Romeo) या चित्रपटामुळे दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ही जोडी चर्चेत आहे. मात्र, इतकी वर्षे ही जोडी एकत्र का आली नाही? याचे गुपित विशाल भारद्वाज यांनीच...

अरे, मी नाना पाटेकर आहे..; दिग्दर्शकाने नानांना तब्बल 20 वर्षे काम न देण्याचं सांगितलं कारण, म्हणाले, ‘ते मला कुठेही गाठून…’

Vishal Bhardwaj on Nana Patekar : बॉलिवूडमधील दोन दिग्गज नावे म्हणजे दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर. या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना चक्क 20 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. सध्या 'ओ रोमियो' (O Romeo) या चित्रपटामुळे ही जोडी चर्चेत आहे. मात्र, इतकी वर्षे ही जोडी एकत्र का आली नाही? याचे गुपित खुद्द विशाल भारद्वाज यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये मिश्कील पद्धतीने उघड केले आहे.

"अरे, मी नाना पाटेकर आहे, मला कधी घेणार?"
विशाल भारद्वाज यांनी कबूल केले की, नानांसोबत काम न करणे ही त्यांचीच एक मोठी चूक होती. "लोक नानांना खूप घाबरतात, पण प्रत्यक्षात ते फणसासारखे आहेत—वरून जरी कडक वाटले तरी आतून ते अत्यंत मऊ मनाचे आहेत," असे विशाल म्हणाले. विशाल यांनी एक मजेशीर आठवण सांगितली की, नाना पाटेकर त्यांना कुठेही भेटले की हक्काने कामाचा तगादा लावायचे. "अरे, मी नाना पाटेकर आहे, अभिनेता आहे, मला कधी कास्ट करणार?" असे ते विचारायचे. विशाल यांना तेव्हा खूप संकोच वाटायचा, कारण त्यांच्याकडे नानांच्या उंचीला साजेसा दमदार रोल उपलब्ध नव्हता. अखेर 20 वर्षांनंतर 'ओ रोमियो'च्या रूपाने तो मुहूर्त सापडला.

ट्रेलर लाँचमधील 'नाना स्टाईल' स्वॅग
काही दिवसांपूर्वी 'ओ रोमियो'च्या ट्रेलर लाँच वेळी नाना पाटेकर वेळेवर पोहोचले होते, पण इतर कलाकार आणि तांत्रिक कारणांमुळे त्यांना तब्बल एक तास ताटकळत ठेवण्यात आले. यामुळे नाना संतापले आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच निघून गेले. यावर भाष्य करताना विशाल भारद्वाज हसत म्हणाले, "नाना म्हणजे वर्गातल्या त्या खोडकर मुलासारखे आहेत, जो शिक्षकांना सर्वात जास्त त्रास देतो पण सर्वात जास्त हसवतोही. आम्ही त्यांना ताटकळत ठेवले, त्यामुळे ते निघून गेले यात काहीच गैर नाही. तोच तर त्यांचा अस्सल स्वॅग आहे, जो त्यांना 'नाना पाटेकर' बनवतो."

हेही वाचा – Salim Khan Hospitalised: सलीम खान लीलावती रुग्णालयात दाखल; सलमान खानसह कुटुंबियांची रुग्णालयात धाव

बॉक्स ऑफिसवर 'रोमियो'ची घोडदौड
13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या 'ओ रोमियो' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली पकड मिळवली आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच तब्बल 20.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी 8.50 कोटी आणि दुसऱ्या दिवशी (व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी) 45% ची मोठी झेप घेत 12.25 कोटींची कमाई केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट नाना पाटेकरांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांसाठी अधिक खास ठरला आहे.

चित्रपटाची तगडी स्टारकास्ट
'ओ रोमियो' हा चित्रपट लेखक हुसेन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित असून, हा एक क्राईम-अ‍ॅक्शन ड्रामा आहे. यामध्ये शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि नाना पाटेकर यांच्यासोबतच अविनाश तिवारी, दिशा पटानी, तमन्ना भाटिया, फरीदा जलाल आणि विक्रांत मॅसी (विशेष भूमिका) असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. शाहीद कपूर आणि विशाल भारद्वाज यांची 'कमिने', 'हैदर' आणि 'रंगून' नंतरची ही चौथी यशस्वी भागीदारी मानली जात आहे.

हेही वाचा – Abhijeet Kelkar Post: ''आज महाराज असते तर अशांना 'टिपू'न 'टिपू'न…''; टिपू सुलतान वादावर अभिनेता अभिजीत केळकरची पोस्ट चर्चेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number