‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विजय’ – प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. साखळी मतदार संघातून प्रमोद सावंत ५०० मतांनी विजयी झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातील प्रमोद सावंत पिछाडीवर होते. मात्र, त्यानंतर सावंत यांनी जोरदार मुसंडी मारत साखळी मतदार संघात ५०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गोव्यात भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री […]

‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विजय’ – प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. साखळी मतदार संघातून प्रमोद सावंत ५०० मतांनी विजयी झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातील प्रमोद सावंत पिछाडीवर होते. मात्र, त्यानंतर सावंत यांनी जोरदार मुसंडी मारत साखळी मतदार संघात ५०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

गोव्यात भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपाला जनतेचा आर्शीर्वाद असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला विजय मिळाला असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. तर भाजपाचे नेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या विजयामुळे गोव्यात भाजपाला विजय सोपा झाला असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

गोव्यात भाजपा पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याचे प्रमोद सावंत म्हणाले आहेत. तसेच मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचेही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number