आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून राज्यात सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नव वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजे १ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू झाली, तर ३ जानेवारीपासून मुलांना प्रत्यक्ष लस देण्यास सुरूवात झाली. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रात शुभारंभ झाला. मुंबईतील […]

आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून राज्यात सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नव वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजे १ जानेवारीपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू झाली, तर ३ जानेवारीपासून मुलांना प्रत्यक्ष लस देण्यास सुरूवात झाली.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रात शुभारंभ झाला. मुंबईतील एकूण नऊ लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून मुलांच्या लसीकरण नोंदणीची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करून लसीकरण घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

राज्यात ठिकठिकाणी मुलांसाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. तर मुंबईत लसीकरणासाठी ९ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. ८ लाखांपेक्षा अधिक पालकांकडून मुलांची नोंदणी होणार असून मुलांचे आधार कार्ड (ओळखपत्र) नसल्यास आयकार्डचा वापर करण्यास पालिकेने मुभा दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number