युक्रेनचे रशियाला ‘जशास तसं उत्तर’

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई केली आहे. रशियाने युक्रेनच्या चार शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव, खारकी, ओडेशा, मारियूपोलमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला ‘जशास तसं उत्तर’ दिले असल्याचा दावा केला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला युक्रेनेनही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धपरिस्थितीमध्ये युक्रेन […]

युक्रेनचे रशियाला ‘जशास तसं उत्तर’

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई केली आहे. रशियाने युक्रेनच्या चार शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव, खारकी, ओडेशा, मारियूपोलमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला ‘जशास तसं उत्तर’ दिले असल्याचा दावा केला आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला युक्रेनेनही रशियाला प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धपरिस्थितीमध्ये युक्रेन लष्कराने मोठा दावा केला आहे. रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतामध्ये ही विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यामध्ये ५० रशियन सैनिक ठार झाले असल्याचेही युक्रेन लष्कराने म्हटले आहे. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक असून मागील आठवड्यात लुहान्स्कला रशियाने वेगळा देश म्हणून घोषित केले.

युक्रेनकडे जाणारी उड्डाणे रद्द

युक्रेनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याचा धोका लक्षात घेत युक्रेनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number