पिंपरी-चिंचवड मधील हे चोर फक्त ब्रँडेड बूट आणि चपला चोरतात !

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांनी हैराण झालेल्या पोलिसांची बूट आणि चप्पल चोरणाऱ्या भुरट्या चोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. हे चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याला पकडणं हे पोलीसांच्यासमोर एक आव्हानच आहे. ब्रँडेड बूट आणि चपला चोरणारा चोर! पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांनी हैराण झालेल्या पोलिसांची बूट आणि चप्पल चोरणाऱ्या भुरट्या चोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. हा चोरटा सीसीटीव्हीत ही […]

पिंपरी-चिंचवड मधील हे चोर फक्त ब्रँडेड बूट आणि चपला चोरतात !

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांनी हैराण झालेल्या पोलिसांची बूट आणि चप्पल चोरणाऱ्या भुरट्या चोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. हे चोर सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याला पकडणं हे पोलीसांच्यासमोर एक आव्हानच आहे.

ब्रँडेड बूट आणि चपला चोरणारा चोर!

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांनी हैराण झालेल्या पोलिसांची बूट आणि चप्पल चोरणाऱ्या भुरट्या चोरांनी डोकेदुखी वाढवली आहे.

हा चोरटा सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरणात ही घटना 29 जुलैच्या मध्यरात्री घडली आहे.

हा चोरटा ब्रँडेड बूट आणि चपला लंपास करतोय. तसेच परिसरातून वेगवेगळ्या जातीचे कुत्रे ही चोरीला जात असल्याची तक्रार आहे.

याआधी एका नगरसेवकाच्या इमारतीतून आणि चाकण परिसरातून ही बूट आणि चपला चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आधीच शहरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेत आणि त्यातच या भुरट्या चोरांना पकडण्याचं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number