आजपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री; टीव्ही, एसी, मोबाईल महागणार

आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले आहे. मात्र, या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थसंकल्पातील बदल आजपासून लागू झाले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तू महागणार आहेत. टीव्ही, एसी, मोबाईल यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार […]

आजपासून ग्राहकांच्या खिशाला कात्री; टीव्ही, एसी, मोबाईल महागणार

आजपासून नवीन आर्थिक वर्ष २०२२-२३ सुरू झाले आहे. मात्र, या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थसंकल्पातील बदल आजपासून लागू झाले असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तू महागणार आहेत. टीव्ही, एसी, मोबाईल यांसारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

नव्या अर्थसंकल्पानुसार, कच्च्या मालावर उत्पादन शुल्क वाढवण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. आणि याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारने १ एप्रिलपासून ऍल्युमिनिअमवर ३० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे टीव्ही, एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

व्यावसायिक एलपीजीच्या दरात वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत होते. परंतु, आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता व्यावसायिक एलपीजीच्या दरात वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number