Ramayana Trailer Release Date : प्रतीक्षा संपली! रामायण चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर; या शुभमुहर्तावर होणार ट्रेलर रिलीज

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण: पार्ट १’ (Ramayana: Part 1) या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून हा ट्रेलर येत्या दोन दिवसात रिलीज होणार आहे. यापूर्वी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या पौराणिक महाकाव्याचा ट्रेलर 24 जुलै रोजी सोशल मीडियावर प्रदर्शित होणार होता. मात्र ट्रेलर प्रदर्शन अचानक पुढे ढकलल्यानंतर नमित मल्होत्राने अखेर रामायण […]

Ramayana Trailer Release Date : प्रतीक्षा संपली! रामायण चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर; या शुभमुहर्तावर होणार ट्रेलर रिलीज

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण: पार्ट १’ (Ramayana: Part 1) या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून हा ट्रेलर येत्या दोन दिवसात रिलीज होणार आहे. यापूर्वी रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या पौराणिक महाकाव्याचा ट्रेलर 24 जुलै रोजी सोशल मीडियावर प्रदर्शित होणार होता. मात्र ट्रेलर प्रदर्शन अचानक पुढे ढकलल्यानंतर नमित मल्होत्राने अखेर रामायण ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रामायण ट्रेलर गुरुवार, 30 जुलै रोजी, ब्रह्म मुहूर्तावर, म्हणजेच पहाटे 4.15 वाजता प्रदर्शित होईल. निर्मात्याने इन्स्टाग्रामवर ही घोषणा शेअर केली आणि लिहिले, “शुभ ब्रह्म मुहूर्तावर, आम्ही 30 जुलै 2026, गुरुवार रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार जगभरात पहाटे 4.15 वाजता आमच्या ट्रेलरसह रामायणाच्या पहाटेचे स्वागत करत आहोत.” 

हेही वाचा : Kangana Ranaut: ‘Gen Z ची भाषा ओंगळवाणी, मला..’ कंगना रणौत यांचं वादग्रस्त वक्तव्य; ‘जनरेशन गटर’ असा उल्लेख करत महिलांवरही आक्षेपार्ह टिप्पणी

सॅन डिएगो कॉमिक-कॉनमध्ये ट्रेलरचे खास अनावरण झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. कॉमिक-कॉनमधील प्रदर्शनानंतर हा ट्रेलर आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने प्रदर्शित केला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, नमित यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची घोषणा करताना लिहिले, “आज आमच्या ‘रामायण’साठी एक अत्यंत खास क्षण आहे. ‘सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट’सोबतच्या भागीदारीमुळे ‘रामायण’ जगापर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही आता आमचा ट्रेलर नंतरच्या तारखेला जागतिक स्तरावर प्रदर्शित करणार आहोत.” रामायणाचा ट्रेलर एक्स (X) वर दोनदा ऑनलाइन लीक झाला असून, चाहते निर्मात्यांना अधिकृतपणे ट्रेलर प्रदर्शित करण्याची विनंती करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number