राजन विचारे शिवसेनेचे लोकसभेत मुख्य प्रतोद

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे.या अंतर्गत राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. […]

राजन विचारे शिवसेनेचे लोकसभेत मुख्य प्रतोद

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे.या अंतर्गत राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना पत्र लिहीत शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्यानंतरच शिवसेनेकडून भावना गवळीयांना हटवण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.आणि आता शिवसेना खासदार राजन विचारे हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number