ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचे दु:खद निधन झाले त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली. दरम्यान उद्या सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान अंतिम दर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलं जाईल. तर उद्या सायंकाळी 4.00 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दादर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतातील सर्वात प्रख्यात आणि अष्टपैलू गायकांपैकी एक असलेल्या श्रीमती आशा भोसलेजी यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. अनेक दशकांचा त्यांचा अनोखा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा ठरला आहे आणि जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्शून गेला आहे. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात एक कालातीत तेज होते. त्यांच्यासोबतच्या संवादांच्या आठवणी मी कायम जपून ठेवीन. त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम गुंजत राहतील.
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण… pic.twitter.com/JsjoxbdCCt — Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026