केसांसाठी तयार करा घरगुती कंडिशनर

आपले लांबसडक , दाट केस असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतू बऱ्याच वेळा केस गळती, कोरडे केस , अपुरे पोषण यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागडे शॅम्पू, हेअर मास्क किंवा ट्रीटमेंट घेता. पण या सर्व पद्धती महागड्या आहेत तसेच हानिकारक रसायनांनी समृद्ध आहेत. ज्याचा तुमच्या केसांवर […]

केसांसाठी तयार करा घरगुती कंडिशनर

आपले लांबसडक , दाट केस असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतू बऱ्याच वेळा केस गळती, कोरडे केस , अपुरे पोषण यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागडे शॅम्पू, हेअर मास्क किंवा ट्रीटमेंट घेता. पण या सर्व पद्धती महागड्या आहेत तसेच हानिकारक रसायनांनी समृद्ध आहेत. ज्याचा तुमच्या केसांवर चांगला कमी तर वाईट जास्त परिणाम दिसून येतो.

यावेळी आपण घरगुती पद्धतीने काही उपाय करू शकतो. आपण घरगुती कंडिशनर तयार करू शकतो. दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस अशा स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंच्या मदतीने हे कंडिशनर तयार केले जाते. या तीन गोष्टी आपल्या केसांना खोलवर पोषण देतात. याने आपले केस मजबूत, मुलायम आणि चमकदार बनतात, तर चला जाणून घेऊया घरगुती हेअर कंडिशनर कसे तयार करावे :

घरगुती हेअर कंडिशनर बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

  • दही
  • मोहरीचे तेल दोन चमचे
  • लिंबाचा रस एक किंवा अर्धा चमचा

घरगुती हेअर कंडिशनर कसे बनवावे?

घरगुती हेअर कंडिशनर तयार करण्यासाठी, आपण प्रथम एक वाटी घयावी. त्यात दही, दोन चमचे मोहरीचे तेल आणि एक-अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.यानंतर या तिन्ही गोष्टी नीट फेटून मुलायम पेस्ट तयार करा.आता तुमचा घरगुती कंडिशनर तयार आहे.

घरगुती कंडिशनर कसे वापरावे?

घरगुती हेअर कंडिशनर लावण्यापूर्वी, आपल्या केस नीट विंचरावे. त्यानंतर तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत चांगली लावा. यानंतर एकतर केस नीट बांधू शकता किंवा टोपीने झाकून घेऊ शकता.मग ही पेस्ट केसांमध्ये कमीत कमी अर्धा ते 1 तास ठेवा. यानंतर आधी पाण्याच्या मदतीने आणि नंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number