भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला असून त्यांची आज जामिनावर सुटका झाली आहे. ३० हजारांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे.
नितेश राणे यांची अखेर ८ दिवसांनी सुटका झाली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या आरोग्याबाबत सतत संशय व्यक्त करून प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे यावरून एखाद्याच्या आजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही राज्याची निमिमत्ता आहे का? तसेच हे नैतिकतेत बसते का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. आम्ही देखील असे प्रश्न उपस्थित करू शकतो असे सांगत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणाबाबत प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे म्हणाले, ईडीच्या कारवाया सुरू होतात तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे. तर महाविकास आघाडीचे जे नेत्यांवर ईडी कारवाई सुरू होते तेव्हाच त्यांना कोरोना कसा होतो, हे प्रश्न आम्ही विचारला तर चालेल का, असेही नितेश राणे म्हणाले.