मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरची प्रवासी बसला धडक दिली यात 30 प्रवासी जखमी तर 7 गंभीर जखमी प्रवाशांना मुंबईला हलवण्यात आले आहे. स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले व उपचारासाठी रूग्णालयात हलवले.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक ढालघर फाटा येथे कंटेनर आणि टेंपो ट्रॅव्हल बसेसमध्ये अपघात झाला. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाली असुन अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे.
तर उर्वरीत जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडून दापोलीच्या दिशेने दोन टेम्पो ट्रॅव्हलर बसेस प्रवासी घेवून निघाल्या होत्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याने या प्रवाशी गाडयांना धडक दिली.
या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाली असून त्यांचं मोठं नुकसान झाल आहे. स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले व उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.