पुण्याच्या दत्तवाडी परिसरात जन्मदात्या आईनेच सहा वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही हाताच्या नस कापून निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. चिमुकलीची आई मनोरुग्ण असल्यामुळे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अक्षरा पाटील असे मृत चिमुकलीचे नाव असून तिचा जन्म अमेरिकेत झाला आहे.
पुण्यातील दत्तवाडी परिसरात आईने पोटच्या चिमुकल्या मुलीची दोन्ही हातातील नस कापून हत्या केल्याची घटना घडली आहे.
सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते आहे.
चिमुकलीची आई मनोरुग्ण असल्यामुळे ही हत्या केल्याचे समजते आहे.
श्वेता पाटील असे आईचे नाव असून अक्षरा पाटील असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
चिमुकलीचा जन्म अमेरिकेत झाल्यामुळे ती अमेरिकेची नागरिक आहे.
त्यामुळे अमेरिकन दुतावासाला याची माहिती देण्यात येणार आहे.
10 वर्षांपूर्वी चिमुकलीच्या आई आणि वडिलांचे लग्न झाले.
गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होते.
मात्र चार वर्षांपूर्वीच श्वेता कुटुंबासह भारतात परतली.
पुन्हा अमेरिकेत जाणार असल्यामुळे श्वेताला ते मंजूर नव्हते.
कुटुंबियांनी अनेकदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ती तयार झाली नाही.
गेल्या 4 वर्षांपासून श्वेतावर मानसोपचार तज्ञांचे उपचार सुरू आहे.