पिंपरी-चिंचवड पोलीस भरती प्रक्रियेत गैरव्यवहारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन छोटीराम जारवाल, प्रताप मोहन सुलाने, जगदीश पन्नुगुसिंगे, रणजितसिंह मदनसिंह महेर, सचिन विष्णू गुसिंगे, सुरेश वाल्मीक गोमलाडू, संदीप रेवप्पा होवाळे यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या भरती सेलचे पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत ७२० शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या भरतीत आरोपी सातच उमेदवारांनी गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.