टीईटी घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; आयएएस अधिकाऱ्याला अटक

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी (टीईटी) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीईटी घोटाळाप्रकरणी कृषी विभागातील आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून अटक केली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी २०१९-२०वर्षीचा टीईटी घोटाळा उघडकीस केला […]

टीईटी घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; आयएएस अधिकाऱ्याला अटक

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी (टीईटी) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीईटी घोटाळाप्रकरणी कृषी विभागातील आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून अटक केली आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांनी २०१९-२०वर्षीचा टीईटी घोटाळा उघडकीस केला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. खोडवेकर यांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले.

तसेच याप्रकरणी आयुक्त तुकाराम सुपे तसेच शिक्षण विभागाचा सल्लागार अभिजीत सावरीकर यांना अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या पेपरफुटी प्रकरणात ४०हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर यांची चौकशी केली असता, याप्रकरणी आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत.

राज्यातील ७८०० शिक्षक बोगस?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२०मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून २०१८मध्ये परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० उमेदवारांना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले  आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number