राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका

“महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टीका केली आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला सवाल करत ‘महाराष्ट्र सरकार काय करतंय ?’ अशी विचारणा केली आहे. तसेच काहीतरी गडबड आहे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भगतसिंग कोश्यारी नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र सरकार कसून टीका […]

राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका

“महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टीका केली आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारला सवाल करत ‘महाराष्ट्र सरकार काय करतंय ?’ अशी विचारणा केली आहे. तसेच काहीतरी गडबड आहे म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

भगतसिंग कोश्यारी नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट महाराष्ट्र सरकार कसून टीका केली आहे. या कार्यक्रमात कविता राऊत देखील या उपस्थित होती.

भगतसिंग कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात बोलताना त्यांनी ही टीका केली. शिवाय “कविता राऊतला आपल्या गावात राहायचं असून देशाची सेवा करायची आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र यावर अजूनही काही झालं नाही.

मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. पण मी कविताला सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकारचे येथे असं काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात,”अशी टीका राज्यपालांनी यावेळी केली.

“आदिवासी भागात शिक्षक मिळत नसतील आणि तसेच शिक्षकांची भरती होत नसेल तर महाराष्ट्र सरकार काय करतंय?,” अशी विचारणादेखील यावेळी त्यांनी केली आहे. राज्यपालांनी यावेळी आपण मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी चर्चा करु असं आश्वासन दिलं.

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकारने वर्ग १ पदावर नोकरी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. शिवाय अद्यापही नोकरी मिळालेली नाही. यासंबंधी कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेटही घेतली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number