शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला. याप्रकरणी, सोमैया यांनी मात्र आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडून कारवाई होण्याआधीच सोमैया यांनी विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. सोमैया यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
किरीट सोमैया यांनी नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना पत्र लिहीली आहेत. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत असं म्हणत, कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला? असा प्रश्नही सोमैया यांनी विचारला आहे. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची आहे असेही सोमैया यांनी म्हटले. मी माझी बाजू स्पष्ट करत नसून या प्रकरणातील सत्यस्थिती सांगत आहे असंही सोमैया यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी पुन्हा सोमैयांची चौकशी होणार का ? संजय राऊतांचे आरोप खरे कि खोटे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.