Indian Idol 16 Winner Jyotirmayee Nayak: सुरेल प्रवासाचा भव्य शेवट! ‘इंडियन आयडॉल 16’ची ट्रॉफी ज्योतिर्मयी नायकच्या नावावर; ट्रॉफीसह मिळालं मोठं बक्षीस

नऊ महिन्यांच्या सुरेल प्रवासाचा भव्य शेवट 26 जूलै रोजी पार पडला आहे. 'इंडियन आयडॉल' सीझन 16 ला अखेर आपला नवा विजेता मिळाला असून शेकडो सुमधुर गाण्यांचा प्रवास संपला आहे.

Indian Idol 16 Winner Jyotirmayee Nayak: सुरेल प्रवासाचा भव्य शेवट! ‘इंडियन आयडॉल 16’ची ट्रॉफी ज्योतिर्मयी नायकच्या नावावर; ट्रॉफीसह मिळालं मोठं बक्षीस

नऊ महिन्यांच्या सुरेल प्रवासाचा भव्य शेवट 26 जूलै रोजी पार पडला आहे. ‘इंडियन आयडॉल’ सीझन 16 ला अखेर आपला नवा विजेता मिळाला असून शेकडो सुमधुर गाण्यांचा प्रवास इथेच संपला आहे. अंशिका चोनकर, मनराज वीर सिंह, मस्कम्मे बोसू, सुहेल सुफी आणि तनिष्क शुक्ला यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत ओडिशाच्या ज्योतिर्मयी नायकनं ‘इंडियन आयडॉल’ सीझन 16 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

यावेळी तिला भव्य ट्रॉफीसह तब्बल 20 लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे जबलपूरचा तनिष्क शुक्ला हा स्पर्धेत ‘फर्स्ट रनर-अप’ ठरला. यंदा इंडिनय आयडॉलची थीम ‘यादों की प्लेलिस्ट’ वर आधारित जुनी आणि सदाबहार गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ‘इंडियन आयडॉल’ सीझन 16 च्या अंतिम फेरीसाठी शोचे परीक्षक श्रेया घोषाल आणि बादशाह यांच्यासोबतच उषा उत्थुप, उदित नारायण, पापन, कुमार सानू, शहनाज गिल आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दाखवली होती

इतर स्पर्धकांप्रमाणेच ज्योतिर्मयी नायक ही देखील विजयाचे स्वप्न उरी बाळगून या मंचावर आली होती, आणि अखेर तिने तिच्या मेहनत, निष्ठा आणि प्रतिभेच्या जोरावर हा प्रवास पूर्ण केला आहे. यावेळी ग्रँड फिनालेमध्ये ज्योतिर्मयीने ‘सैयां ओ सैयां’ हे गाणं दमदार आणि मंत्रमुग्ध करत अविस्मरणीय परफॉर्मेंस केला. तिच्या आवाजावर आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेत्री लीना चंदावरकर या देखील प्रभावित झाल्या आहेत. ‘इंडियन आयडॉल’मध्ये येण्यापूर्वीपासूनच ज्योतिर्मयी नायक म्युझिक थेरपीमार्फत कॅन्सर रुग्णांना मदत करते. ही तिच आहे जिनं, तिच्या आवाजासोबतच तिच्या कृतीतूनही लोकांची मनं जिंकली आहेत.

हेही वाचा- Batatyachi Chal Marathi Theatre: चाळ पुन्हा रंगणार! पुलंची ‘बटाट्याची चाळ’ नव्या संगीतिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

ज्योतिर्मयी नायक मानले  सर्वांचे आभार मानले 
“जय श्री जगन्नाथ, एक वर्ष. अगणित त्याग. अविरत सराव. जागरण. अश्रू, हास्य, प्रार्थना आणि अढळ श्रद्धा. आज, इंडियन आयडॉल सीझन 16 ची ट्रॉफी हातात धरताना, माझं मन केवळ कृतज्ञतेने भरून आलं आहे. हा विजय केवळ माझा नाही—तो त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्यांनी मला स्वतःवर शंका असताना माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी मला मत दिलं, माझ्यासाठी प्रार्थना केली, मला प्रोत्साहन दिलं आणि या अविश्वसनीय प्रवासात माझ्या पाठीशी उभे राहिले.”

“@aanandsmusicसर, माझे मार्गदर्शक, सर, तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात हे शब्दांत व्यक्त करणे कधीच पुरेसे नाही. सर, हा विजय तुमचा आहे आणि तुम्ही माझ्या प्रत्येक सादरीकरणात जी जादू केली आहे, त्याचेच हे फळ आहे. @annannyasethhदी, तू केवळ माझी मार्गदर्शक नाहीस, तर माझी अशी बहीण आहेस जिला देवाने मला प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले आहे. @chitralangehमॅडम, या मोठ्या संधीबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे!”

“@dhvani_291मला माहित असूनही तुम्हाला आमची काळजी कशी आहे हे मला नेहमी लक्षात राहील. @imssumitanandभैया, तुमच्याबद्दल काय बोलू? तुम्ही आमचे मॉनिटर आहात याचा मला खूप आनंद आहे आणि अनेक प्रसंगी तुम्ही मला शांत राहण्यास मदत केली आहे. माझे कुटुंब, मित्र, मार्गदर्शक आणि चाहते, तसेच प्रत्येक संगीतकार, तंत्रज्ञ, स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, कॅमेरा क्रू, प्रोडक्शन टीम आणि इंडियन आयडॉल परिवारातील प्रत्येक सदस्य—हे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. पडद्यामागे तुमच्या कठोर परिश्रमामुळेच प्रत्येक सादरीकरण शक्य झाले.”

“आमच्या आदरणीय परीक्षकांचेही मनःपूर्वक आभार. @shreyaghoshal मॅडम, @badboyshah सर आणि@vishaldadlani सर आणि आमचे @adityanarayanofficial दादा, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि प्रत्येक मंचावर एक उत्तम कलाकार बनण्याची प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे शब्द माझ्यासोबत कायम राहतील.”

“ओडिशामधून आणि भारत व जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्या सर्वांची ही ट्रॉफी आहे.️ हा एका प्रवासाचा शेवट नाही; तर एका खूप मोठ्या स्वप्नाची ही सुरुवात आहे. मी शिकत राहण्याचे, गात राहण्याचे आणि तुम्हाला अभिमान वाटेल असेच काम करत राहण्याचे वचन देते. अथांग प्रेम आणि कृतज्ञतेसह, ज्योतीर्मयी नायक, स्वप्नसाकारले, धन्य, कष्टाचे फळ मिळते ज्योतीर्मयी नायक निरोप घेते!”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number