Yashwantrao Chavan Award Jayesh Mestri : मराठी लेखनाला मोठा सन्मान! जयेश मेस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2026 ची घोषणा झाली असून, यात प्रसिद्ध लेखक जयेश मेस्त्री यांना ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Yashwantrao Chavan Award Jayesh Mestri : मराठी लेखनाला मोठा सन्मान! जयेश मेस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2026 ची घोषणा झाली असून, यात प्रसिद्ध लेखक जयेश मेस्त्री यांना ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जाहीर केलेल्या या पुरस्कारांचे वितरण 27 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक येथे एका भव्य समारंभात आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी एकूण 35 साहित्यिकांना विविध वाङ्मय प्रकारांत सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक जयेश मेस्त्री यांच्या ‘जादूचा दिवा’ या बालनाट्य पुस्तकाला जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असणार असून प्रौढ वाङ्मय व बृहन्महाराष्ट्र पुरस्कारांसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये तसेच बाल व प्रथम प्रकाशन विभागासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये अशी रोख रक्कम देण्यात येणार आहे. जयेश मेस्त्री यांना मिळालेल्या ‘भा. रा. भागवत पुरस्कारा’ अंतर्गत त्यांना 50 हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. ‘भा. रा. भागवत पुरस्कारा’ हा पुरस्कार इतर पुरस्कारांमध्ये बाल वाङ्मय विभागातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. या सन्मानामुळे मराठी बालसाहित्यात मेस्त्री यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. यावेळी त्यांनी ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असून मी यापुढे आणखी चांगल्या प्रकारे रंगमंच व रसिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. तसेच मला लिहिते करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांनी या सन्मानाबद्दल आपले भावूक मनोगत व्यक्त केले. 

'यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार' आणि ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ माहिती
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार प्रौढ साहित्य, बालसाहित्य, आणि बृहन्महाराष्ट्र अशा विविध विभागांत, तसेच नवीन लेखकांसाठी जाहीर केला जातो. तसेच भास्कर रामचंद्र भागवत हे मराठी बालसाहित्यातील दिग्गज लेखक होते. ज्यांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. 'फास्टर फेणे'च्या जनकाचा गौरव महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शिरोळे पुरस्कार (1954), आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या गौरव पुरस्काराने करण्यात आला होता. तसेच, त्यांनी 1975च्या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number