‘मी झुकणार नाही आणि जनतेलाही झुकू देणार नाही’ – इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यानंतर गुरुवारी पाकिस्तान विधानसभेचे कामकाज ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर, पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी रात्री संबोधित केले. इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, मी झुकणार नाही आणि पाकिस्तानी जनतेलाही झुकू देणार नाही. […]

‘मी झुकणार नाही आणि जनतेलाही झुकू देणार नाही’ – इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यानंतर गुरुवारी पाकिस्तान विधानसभेचे कामकाज ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर, पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी रात्री संबोधित केले.

इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, मी झुकणार नाही आणि पाकिस्तानी जनतेलाही झुकू देणार नाही. अमेरिकेसोबत गेल्याने पाकिस्तानची फरफट झाली असल्याचे इमरान खान यांनी सांगितले आहे. माझ्या रशिया दौऱ्यावरून अमेरिका नाराज असल्याचे ते म्हणाले. तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानसाठी मुक्त परराष्ट्र धोरण आवश्यक असून पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण भारताविरोधात नसल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. कलम ३७० हटण्यापूर्वी कधीही भारताविरुद्ध बोललो नाही तसेच मी राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी पाकिस्तानचा फैसला होणार असून सर्व गद्दारांचे चेहरे लक्षात ठेवा, असे इम्रान खान म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number