‘पदाची अपेक्षा नाही’

गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येत आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम शुक्रवारी गोपीनाथ गडावर होत आहे.  शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्या म्हणाल्या की मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेतून राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यावरून […]

‘पदाची अपेक्षा नाही’

गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येत आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम शुक्रवारी गोपीनाथ गडावर होत आहे.  शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्या म्हणाल्या की मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेतून राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. मात्र भाजपने दोन्ही राज्यसभेच्या उमेदवारीची नावे घोषित केल्याने या गोष्टीला पुर्णविराम मिळाला आहे. तर आता विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर बोलताना नावे अनेक चर्चेमध्ये आहे, पक्ष काय निर्णय घेईल ते आगामी काळात बघुया असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

राज्यसभा असेल किंवा विधानपरिषद असेल यासाठी तुमच्या नावाची चर्चा होते. मात्र, पक्ष संधी देत नाही की नेमकं काय घडत आहे. तुम्हाला संधी का मिळत नाहीये असे पंकजा मुंडे यांना वितारण्यात आले. यावर बोलताना मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही. कुठल्यासंधी साठी मी प्रयत्न करत नाही. कुठल्या संधीसाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये माझा नंबर नाही. जे मिळते त्याची संधी करून दाखवणे, मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवणे हे माझे काम आहे. हे माझे संस्कार आहे. संधीसाठी रांगेत वाट पाहण्याची माझी प्रवृत्ती नाही असही त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number