हिजाब प्रकरण : राज्यात शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

हिजाब प्रकरणावरून कर्नटकमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असून महाराष्ट्रामध्येही पडसाद उमटत आहेत. तसेच प्रकरणावरून आज मालेगावमध्ये हिजाब दिन पाळण्यात येत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रात वाद निर्माण करू नका. कर्नाटकमध्ये हिजाबचा विषय […]

हिजाब प्रकरण : राज्यात शांतता राखण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन

हिजाब प्रकरणावरून कर्नटकमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असून महाराष्ट्रामध्येही पडसाद उमटत आहेत. तसेच प्रकरणावरून आज मालेगावमध्ये हिजाब दिन पाळण्यात येत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रात वाद निर्माण करू नका. कर्नाटकमध्ये हिजाबचा विषय झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी आपल्या राज्यामध्ये अशांतता पसरवू नका, असे आवाहन दिपील वळसे पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाले, आपण अनावश्यकदृष्ट्या जाती-धर्मात तेढ निर्माण करायला लागलो तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहीजे. अशाप्रकारचे आंदोलन करू नये अशी भूमिका सर्वांनी घ्यायला हवी. राजकीय पक्षांनीही राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करून पोलिस विभागाचे काम वाढवू नये तसेच शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number