Hema Malini’s emotional tribute to Dharmendra: बॉलीवुडचे लीजेंड धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी 89 वर्षांच्या वयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी, अभिनेत्री आणि त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक सहजीवनाबद्दल मनापासूनच्या भावना व्यक्त केल्या.
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत लिहिलं, “धरमजी… हे माझ्यासाठी खूप काही होते. माझा प्रेमळ पती, आमच्या दोन मुली इशा आणि अहानचे लाडके वडील, मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, कवी, आणि मला गरज वाटेल अशावेळी माझा आधार. खरंतर ते माझ्यासाठी सगळंच होते.” हेमा मालिनीच्या या शब्दांमधून धर्मेंद्र यांच्याबद्दल असलेलं अपार प्रेम आणि आदर स्पष्ट दिसून येतो.
त्यांनी पुढे लिहिलं, “चांगल्या-वाईट काळात ते नेहमी माझ्या सोबत उभे राहिले. त्यांच्या सहज आणि आत्मीय वागण्यामुळे त्यांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मन जिंकले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा वर्षाव आम्हा सर्वांवर राहिला.” हेमा मालिनीच्या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना एकदा पुनः त्यांच्या प्रिय जोडीदाराची आठवण झाली आहे.
धर्मेंद्र हे एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून नेहमीच आदर्श ठरले. हेमा मालिनी यांनी लिहिलं की, “त्यांची प्रतिभा आणि लोकप्रियतेनंतरही असलेली विनम्रता त्यांना एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व बनवते.” धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे हेमा मालिनीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांनी म्हटलं की, “माझ्या आयुष्यात तयार झालेली ही पोकळी कधीच भरू शकणार नाही. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर आता माझ्याकडे फक्त आठवणीच उरल्या आहेत.”
Dharam ji❤️
He was many things to me. Loving Husband, adoring Father of our two girls, Esha & Ahaana, Friend, Philosopher, Guide, Poet, my ‘go to’ person in all times of need – in fact, he was everything to me! And always has been through good times and bad. He endeared himself… pic.twitter.com/WVyncqlxK5 — Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही ओळख झाली आणि कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र यांचे आधीच प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते व त्यांना चार अपत्ये होती, परंतु हेमा मालिनीवर असलेलं प्रेम लक्षात घेऊन त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनीशी विवाह केले. या विवाहातून त्यांना दोन मुली इशा आणि अहाना झाल्या.
सोशल मीडियावर हेमा मालिनींच्या भावनिक पोस्टनंतर चाहते आणि फॅन्स कमेंट्स करत शोक व्यक्त करत आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत शेअर केलेले फोटो आणि आठवणी व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही या पोस्टद्वारे धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
धर्मेंद्र हे फक्त चित्रपटसृष्टीचे नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने फॅन्समध्ये शोककळा पसरली असून, हेमा मालिनीच्या पोस्टमुळे त्यांच्या प्रेमाची आणि सहजीवनाची आठवण सर्वांवर पुन्हा ताज्या झाली आहे.
हेमा मालिनींच्या भावनिक शब्दांमधून दिसते की, धर्मेंद्र फक्त त्यांचे पती नव्हते, तर मार्गदर्शक, मित्र आणि संपूर्ण कुटुंबासाठी आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने भारताच्या चित्रपटसृष्टीत एक मोठा शून्य निर्माण झाला आहे.