राजकीय नेत्यांनी साजरा केला ‘गुढीपाडवा’

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदा गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नव वर्षाच्या दिवशी नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही उत्साहात गुढीपाडवा साजरा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरच्या नववर्षाच्या स्वागताच्या शोभायात्रेत सहभागी होऊन गुढीपाडवा साजरा केला. नागपुरातील चौकात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागताची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती […]

राजकीय नेत्यांनी साजरा केला ‘गुढीपाडवा’

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदा गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नव वर्षाच्या दिवशी नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही उत्साहात गुढीपाडवा साजरा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरच्या नववर्षाच्या स्वागताच्या शोभायात्रेत सहभागी होऊन गुढीपाडवा साजरा केला.

नागपुरातील चौकात सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागताची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती पालखीत बसून मिरवणूक काढण्यात आली. वेगवेगळ्या ढोल ताशा पथक यांनी यावेळी शोभायात्रामध्ये सहभाग घेतला होता. मोठ्या प्रमाणात नागरिक देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते. कोरोनाच्या दोन वर्षात गुढीपाडवा साजरा करता न आल्यामुळे यंदा नागपूरकर मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करत आहेत. या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साजरी केला गुढीपाडवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी साजरा केला गुढीपाडवा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुढीपाडवा साजरा केला. भोकरदन येथील त्यांच्या निवासस्थानी दानवे यांनी गुढीपाडवा साजरा केला. रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली. तसेच रावसाहेब दानवे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे नागरिकांना लसीकरणाचे आवाहन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील भाग्यनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारली. यावेळी टोपे यांच्या पत्नी मनिषा टोपे यांच्यासह कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. टोपे यांनी कुटुंबियांसह गुढीची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोना लसीकरण राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं.

चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी उभारली गुढी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारुन, त्याचे पूजन केले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

चंद्रकांत पाटील यांनी निवासस्थानी उभारली गुढी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारुन, त्याचे पूजन केले. तसेच सर्वांना उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number