आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दरम्यान, संसद भवनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी उत्तम चर्चा आणि अधिवेशनादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात मी सर्वांचे स्वागत करत आहे. या अधिवेशनादरम्यान, भारतासाठी अनेक संधी आहेत. देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण, भारताच्या लसींमुळे भारतावर संपूर्ण जगाचा विश्वास तयार झाला आहे. त्यामुळे अधिवेशनात यावर योग्य चर्चा व्हावी, असे मत मोदींनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व राजकीय पक्षातील सदस्य योग्य चर्चा करून देशाला पुढे नेण्यास मदत करतील. त्यामुळे मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, अधिवेशनादरम्यान फलदायी चर्चा करावी, असे पंतप्रधान म्हणाले.