राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका करणार्या कंगना राणावतला मोजक्या शब्दात फटकारले आहे. ‘एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते आणि बोलते. परंतु तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळले पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
कंगना राणावतने महात्मा गांधीजींचा अपमान केला आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवले तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करू शकतो. मात्र कंगना राणावतने महात्मा गांधी (बापूंचा) अपमान केला आहे. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे हे साऱ्या देशाला माहित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. तसेच नियोजन पद्धतीने महात्मा गांधी यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांविरोधात वातावारण निर्माण करण्याचे काम आधीपासून सुरू असल्याचे मलिकांनी सांगितले आहे.