प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालघरमध्ये आरोग्य विभागाचा संतापजनक प्रकार समोर आला. पालघरमधील जव्हार येथे कुटुंबाकडे पैसे नसल्यामुळे मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका नाकारली असल्याचा प्रकार घडला. मृतदेह नेण्यास रुग्णवाहिकेने नकार दिल्यामुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह मोटारसायकलवरून नेण्यात आला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
‘दारु विक्री करण्याऐवजी प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्या’, अशा शब्दांत पालघरमधील घटनेचा दाखला देत देवेंद्र फडणवीसांनी मविआला खडेबोल सुनावले आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले की, ‘काही कंपन्यांना फायदा होण्यासाठी सुपर मार्केटमध्ये मद्य विकण्यास परवानगी देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रजासत्ताक दिनादिवशी पालघरमध्ये वडिलांनी आपल्या ६ वर्षाचा मृतदेह दुचाकीवर बांधून घरी नेले. वडिलाला कोणतेही वाहन किंवा रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवरून ६ वर्षाचा मृतदेह नेण्यात आला.’
AbsoluteSHAME!
Instead of allowing liquor from super market to benefit ‘some’ companies, MVAmust focus on basics facilities.
See what happened in Palghar👇🏻a father tied body of 6yr old son on bike,took him home as he couldnt find any vehicle or ambulance,a day before RepublicDay. pic.twitter.com/WX5pX6OdcZ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2022
देशात ७३व्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पालघरमध्ये हा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. जव्हारमधील पायरवाडी येथील अजय पारधी या सहा वर्षीय चिमुकल्याचा रुग्णायलयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, कुटुंबाकडे मृतदेह नेण्यास पैसे नसल्याने रुग्णायल प्रशासनाने रुग्णवाहिका नाकारली. त्यामुळे पित्याला मोटारसायकलवरून आपल्या लेकाचा मृतदेह न्यावा लागला.