काँग्रेस आमदाराकडूनच कोरोना नियम पायदळी

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदार संघाचे काँग्रेस आमदार राजेश एकडे यांचा वाढदिवस वल्ली चौकात कोरोना नियम पायदळी तुडवत ढोल ताशे आणि फटाके फोडून साजरा केला गेला. त्यामुळे निर्बंध फक्त सामान्य जनतेला पण आमदार आणि राजकीय लोकांना कुठलेच निर्बंध नाहीत का ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात उभा राहिला आहे. बुधवारी संध्याकाळी वल्ली चौक येथे आमदारांचा वाढदिवस […]

काँग्रेस आमदाराकडूनच कोरोना नियम पायदळी

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदार संघाचे काँग्रेस आमदार राजेश एकडे यांचा वाढदिवस वल्ली चौकात कोरोना नियम पायदळी तुडवत ढोल ताशे आणि फटाके फोडून साजरा केला गेला. त्यामुळे निर्बंध फक्त सामान्य जनतेला पण आमदार आणि राजकीय लोकांना कुठलेच निर्बंध नाहीत का ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात उभा राहिला आहे. बुधवारी संध्याकाळी वल्ली चौक येथे आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

लोक विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले . विशेष म्हणजे यावेळी लहान मुलांची गर्दीही होती.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार चार वाजल्यानंतर जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी असतानाही वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.लोकप्रतिनिधी व नेत्यांसाठी कुठले नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number